सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान
सावळी (सदोबा) बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने दिली पिक कर्जा विषयी माहिती
———————————————
सावळी (सदोबा) भारत हा कृषिप्रधान देश असून याच देशात आपला शेतकरी सावकाराच्या कर्जापायी स्वतःची जीवनयात्रा संपवत आहे. आजही आपल्या या शेतकऱ्याला किसान कार्ड, प्रधानमंत्री किसान अर्थसाह्य योजना, पीक कर्ज यासारख्या विविध प्रकारच्या शासनाच्या योजनेबद्दल अज्ञानता दिसुन येते, यासऱ्या बाबीचा विचार करित बँक आपल्या दारी या कल्पनेच्या अनुषंगाने आज सुभाषनगर (लोकरवाडी) येथे बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्मचारी वर्गानी प्रत्यक्ष भेट देत सर्व ग्रामस्थांना पीक कर्जा संबंधित माहिती दिली. यावेळेस बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावळीचे शाखा प्रबंधक श्री रामटेके साहेबांनी प्रत्यक्ष पीक कर्जाची उचल, त्याची परतफेड, इतर कर्ज उचल, थकीत कर्जखात्याची भरणा करण्यासंबंधित संजीवनी योजना, या सर्व बाबीची अतिशय सुक्ष्म माहिती शेतकऱ्याना दिली, त्याबरोबरच कुठल्याही सावकाराच्या जाच्यात न अडकता सरळ बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करित शेतकऱ्यांना दिलासा दिला. या भेटीचे विशेष आकर्षण हे बँक ऑफ महाराष्ट्र मुख्यालय चंद्रपूर चे कर्मचारी वर्ग ठरले, या सर्व कार्यक्रमात ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमला भरभरून प्रतिसाद दिला. या भेटीकरिता बँक मित्र रोहित राठोड यांनी मोलाची भूमिका पार पाडली
