Home यवतमाळ स्मशान भूमीतील बांबूपासून तयार होणार ट्री गार्ड

स्मशान भूमीतील बांबूपासून तयार होणार ट्री गार्ड

8

जिल्हा प्रतिनिधी गोकुल खडसे

स्मशान भूमीतील बांबूपासून तयार होणार ट्री गार्ड

यवतमाळ -: संकल्प फाउंडेशनच्या ह्या उपक्रमाला लवकरच सुरुवात
स्थानिक यवतमाळ शहर व लगतच्या सर्व स्मशानभूमीमधील अंत्यविधी पार पडल्यानंतर उर्वरित तिरडीच्या बांबूपासून ट्री गार्ड तयार करण्याचा संकल्प आज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला,हिंदू संस्कृती मध्ये स्मशान भूमी मध्ये तिरडीचे उरलेले बांबू नाहक जाळण्याची क्रिया होते,एखाद्या कुटुंबातील मृतात्म्याचा अंत्यविधी पार पडल्यानंतर उरलेले बांबू तोडून चितेवर टाकण्यात येतात,बांबूच्या धुराचे प्रदूषण मानवी जीवणासाठी पोषक नसते,त्यातही चिताग्नी साठी लागणारी लाकडे असतातच,ह्या बांबूचा उपयोग चांगल्या प्रकारे करण्याकरिता संकल्प फाउंडेशन च्या वतीने यवतमाळ शहर,वडगाव,वाघापूर,मोहा,लोहारा ह्या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये फलके लावून नागरिकांना भावनिक आव्हान करण्यात येणार आहे,साधारण 3 बांबूपासून 2ट्री गार्ड तयार होतात, त्या अनुषंगाने हजारो ट्री गार्ड तयार करून यवतमाळ शहरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होईल,व तिरडीवर शेवटचा प्रवास करणाऱ्या मृतात्म्याच्या स्मृती कायमस्वरूपी ट्री गार्ड व पर्यायाने वृक्षाच्या माध्यमातून जिवंत राहील, यवतमाळ शहर हिरवेगार होण्यास सुद्धा मदत होईल,ह्याकरिता आज संकल्प फाउंडेशन च्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकारी मडावी मॅडम ह्यांना निवेदनाद्वारे उपक्रमाची।माहिती देण्यात आली व त्याकरिता नगरप्रशासनाने स्मशानभूमीमध्ये फलके लावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली, तसेच स्मशान भूमी मधील अनेक समस्यांवर सुद्धा चर्चा होऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन ह्यावेळी मुख्याधिकारी न प च्या वतीने देण्यात आले
संकल्प फाउंडेशन च्या वतीने अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सचिव,वसंत शेळके,रमेश राऊत,नितीन माटे, नितेश यादव,राजू गिरी,निकेश तिरपुडे,मनीष इसाळकर,प्रशांत एम्बडवार,प्रमोद मेश्राम,विनोद दोंदल,राम कुकडे,आकाश भारती, शुभम गावंडे,सागर तुमसरे,अक्षय हांडे,अनिकेत गोपाळे,साई यादव तर संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख,अंजली फेंडर,वैशाली पिसाळकर,वर्षा सरागे ,संगीता टिप्रमवार,निकिता बाविस्कर,पूनम शेंडे,सरिता यादव,कु कांबळे उपस्थित होते.अशी माहिती संकल्प फाउंडेशनचे प्रसिद्धीप्रमुख सुकांत वंजारी यांनी दिली.

Copyright ©