Home यवतमाळ बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने समाजसुधारक केशव सिताराम ठाकरे उर्फ...

बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने समाजसुधारक केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती

8

किनवट प्रतिनिधी

बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने समाजसुधारक केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला .सर्वप्रथम प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे अन्याय-अत्याचार जातीव्यवस्था व अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी लेखणी वक्तृत्व व प्रत्यक्ष कृतीचा वापर करून वंचित घटकांना न्याय दिला त्याचबरोबर त्यांनी बालविवाह आणि हुंडाप्रते विरुध्द लढा दिला लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकाच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला ते एक उत्तम लेखक पत्रकार साहित्यिक होते तसेच ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ तील प्रमुख नेत्यांपैकी एक होते असे प्रा. पुरुषोत्तम येरडलावार म्हणाले. महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील डॉ.आनंद भालेराव महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सुलोचना जाधव ,प्रा.राजकुमार नेमानीवार , कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, डॉ. शुभांगी दिमंदाकिनीवे, डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.मंदाकिनी राठोड,डॉ. पंजाब शेरे ,प्रा. आम्रपाली हटकर, प्रा. ज्ञानेश्वर चाटे ,सुधीर पाटील आदी उपस्थित होते

Copyright ©