लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान 9422192691
——————————————–
गणेश भक्तांनी केली कोविड निर्बंध लसीकरणाची जनजागृती
——————————————–
लाडखेड- स्थानिक एकता गणेश उत्सव मंडळाकडून गणपती बाप्पाची स्थापना झाली की, भक्तिमय वातावरणा सह ते सामाजिक बांधिलकी जोपासून दरवर्षी जनउपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवितात तीच परंपरा कायम ठेवत याहीवर्षी कोरोना मुळे भयभीत झालेल्या जनतेला त्यापासून मुक्त करण्यासाठी गणपती बाप्पाला साकडे घालून कोरोना वर निर्बंध आणण्यासाठी त्यावरील लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम दिनांक१६ सप्टेंबर ला राबविण्यात आला.
कोरोना महामारिने देशासह अख्या जगाला हादरून टाकले. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रयत्नानंतर लसीचा शोध लावला. सध्या ही लस युद्ध स्तरावर देण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात या लसी विषयी असलेल्या गैरसमजामुळे फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लाडखेड येथिल एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष शुभम निमकर, उपाध्यक्ष अक्षय बेहरे,
सचिव सूरज निमकर यांनी पुढाकार घेऊन गावात जनजागृती करीत लसीचे महत्व पटवून दिले. आणि लसीकरण करवून घेतले. यावेळी गावचे सरपंच माणिकरावजी चिरडे, उपसरपंच मनोज दुधे, वैद्यकीय अधिकारी डॉ पल्वी ढोक, आरोग्य सेवक पंकज नखाते, आरोग्य सेविका उज्वला बिजवे आशा सेविका रेखा कटारणे, डाटा ऑपरेटर रोहित निमकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली. यासाठी एकता गणेश मंडळाचे अविनाश निमकर, सुनिल देउळकर, अरुण निमकर, विलास शिरसाट, धनजय निमकर, अनिल निमकर, विजय घोड़े, मनोज तायडे, संजय सोणकर, हर्षल बोरोले प्रतीक निमकर बंडू पाचखण्डे यांनी अथक परिश्रम घेवून हा लसीकरणाचा उपक्रम यशस्वी पार पाडला. या उपक्रमाने गावातील जनतेत मंडळा चे कौतुक व्यक्त केले जात आहे. आरोग्य विभागाला या गणेश मंडळांनी जे सहकार्य केले त्याबद्दल आरोग्य विभागाकडून आभर मानले आहे
