राजू चव्हाण कार्यकारी संपादक
अंजी (नृसिंह) जि.प. शाळेत सायकलीचे वाटप
———————————————
घाटंजी – जि. प. उ. प्रा मराठी शाळा अंजी नृ येथे मानव विकास मिशन योजनेतून इयत्ता आठवी च्या चार पात्र मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सरिता राजू शुक्ला ( अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती) हे होते. गोपाल डंभारे ( सरपंच), वर्षा कांबळे ( उपसरपंच), भाष्कर वेट्टी ( मुख्याध्यापक), शाळा व्यवस्थापण समिती सदस्य श्री. अनिल डंभारे, सोनू ठाकरे, सुरक्षा पाचपोहर, मीना देवगडे, श्रद्धा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतूण मुख्याध्यापक भाष्कर वेट्टी यांनी पात्र मुलींचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. मानव विकास मिशन योजना यशस्वी पणे राबविण्याकरीता दिपीका गुल्हाने ( गटशिक्षणाधिकारी), ताई वैद्य ( विस्तार अधिकारी), सुनील बोंडे ( केंद्रप्रमुख), संजय पातोडे ( साधन व्यक्ती) यांचे विशेष मार्गदर्शन मिळाल्याचे आवर्जून उल्लेख केला. व सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमदास राठोड तर आभार किरण चिखलकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राजू शेंन्डे, गजानन डंभारे, अश्विनी नारायणे यांनी परिश्रम घेतले.
