Home Breaking News गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; तीन कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; तीन कोरोनामुक्त

8

 

जिल्हा प्रतिनिधी

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; तीन कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2169 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 12 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या चार आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 792 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72865 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71074 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 31 हजार 966 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 58 हजार 869 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.95 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.00 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2169 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2169 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 782 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©