कोणत्या संजय सोबत जावं इच्छुकांना पडला प्रश्न ?
आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे इच्छुकांना डोहाळे
नगरपरिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता अनेक इच्छुकांच्या मनात धुसफूस सुरू असून कोणत्या संजय चा झेंडा घ्यावा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे ही शंका मनोमन इच्छुक उमेदवारांच्या मनात निर्माण करीत आहे.सहकार क्षेत्रासह स्थानिक संस्थांवर संजय देशमुख यांचे प्रभुत्व कायम असून गेल्या दहा वर्षा पासून शिवसेना पालिकेच्या सत्तेमध्ये असून स्थानिक आमदार संजय राठोड हे सुद्धा शिवसेनेचे असल्यामुळे दिग्रस शहराच्या विकासाकरिता भरपूर निधी खेचून आणण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याची प्रचीती संपूर्ण दिग्रस वासियांना आहे.मात्र दिग्रस नगरपालिका हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात पालिकेच्या सत्तेत राहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरून विकास निधीत दलालीनेच हात माखल्याचे नगरसेवकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी दिग्रसकरांना जाणीव करून दिली.दिग्रस शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयाचा निधी पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे खितपत पडल्याने अनेक वेळा तो परत जाऊन पुन्हा संजय राठोड यांच्या प्रयत्नाने परतही मिळविण्यात यश मिळाले.मात्र शहराच्या विकासाऐवजी कमिशन खोरी च्या ग्रहणाने सत्ताधारी गटातच तालमेल नसल्याने जून महिन्यातील संजय राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून चढाओढीने बॅनरबाजी करण्यात एकमेकांच्या विरोधात एकमेकांशी दंड थोपटण्याचे सोपस्कार पार पडल्याने.इच्छुक उमेदवारांना कोणत्या संजय चा झेंडा हाती घ्यावं ही संभ्रमावस्था असल्याने तसेच 14 वर्षाचा कार्यकाळ उलटूनही ज्या 952 घरातील कुटुंबे नांदगाव धरणाच्या विध्वंसकाणे उघड्यावर येऊन काही परिवारातील 14 नागरिकांना जलसमाधी मिळाली होती.14 वर्षाचा दीर्घकाळ संपून झाला तरी मात्र त्या 952 घरकुलाचा प्रश्न संजय देशमुख तसेच वीस वर्षापासून संजय राठोड सत्तेत असूनही त्यांनाही सोडवता आला नसल्यामुळे पीडितांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिग्रस करांच्या भावना व्यक्त होताना दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर नगरपालिकेच्या मालकीचे अनेक कॉम्प्लेक्स मधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना लीज ची मर्यादा संपल्याच्या कारणावरून आर्थिक फटका बसल्याचे जिवंत उदाहरणे डोळ्यासमोर ठेऊन अनेक इच्छुक कोणत्या संजयचा झेंडा हाती घेऊ ह्या संभ्रमात असल्याचे चित्र दिग्रस च्या इच्छुकांनमध्ये पाहायला मिळत आहे
