नितीन मिर्झापुरे मित्र परिवार याच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले शस्त्र क्रिया झालेल्या रुग्णाची भेट घेऊन त्यांना धीर दिला नमो
“नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची घेतली भेट !””
मोतिबिंदू ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून या समस्येमुळे त्या व्यक्तीचे दृष्टीपटल धुरकट झाल्यामुळे त्याला स्पष्ट दिसू शकत नाही. ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांना दैनंदिन कामे करण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. मात्र ग्रामीण भागामध्ये रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे वेळेवर त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही वेळेवर उपचार न मिळाल्यास डोळे गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी मी पुढाकार घेऊन नाकापारडी सरपंच प्रेम धुर्वे व, डॉ महात्मे नेत्रपीढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नाकापारडी येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३५० रुग्णांची तपासणी केली असता ८१ रुग्णांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी रुग्णांची पहिली बॅच महात्मे नेत्र पेढी नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठवून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे,या शिबिराला सरपंच प्रेम धुर्वे, उपसरपंच दिनकर भवरे,ग्रामसेवक भगत साहेब,पोलीस पाटील निलेश बोरकर,सरपंच घाटाना सरपंच सुरपाम,हिवरी ग्राम सदस्य वृषभ माहुरे,रवी राऊत,सचिन चरूळकर, बजरंग बायस्कर, अमित राठोड, भूषण धांदे,रुपेश डाके,दादू बडिये, निशिकांत नैताम, प्रणय बीरे, व गावातील नागरिक उपस्तीत होते, या कार्यक्रम साठी परिश्रम घेणारे रोशन राणे,अर्पित भवरे, पंकज सोनवणे,निलेश खंडारे,अजय वाघडे, प्रवीण पुसनाके यांच्या प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वी झाला
