Home यवतमाळ वणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे अन्वेषक शाखेचे प्रमुख गोपाल जाधव...

वणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे अन्वेषक शाखेचे प्रमुख गोपाल जाधव यांचा निरोप समारंभ.

23

.

संपूर्ण विदर्भात बहुचर्चित असलेली बहुगुणी वणी आली वठणीवर.।

एकेकाळी वणी ही मोठ्या प्रमाणात बहुगुणी असल्याची चर्चा ,संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्हातसुद्धा प्रचलित होती. वणी तालुक्यात काही वर्षापूर्वी गुन्हेगारीची चरणसीमा पार केली होती. त्यामुळे महिन्यातून एक तरी, मोठी गुन्हेगारी कारवाई किंवा एखादा मोठा गुन्हा हा निंत्याचा उपक्रम झाला होता. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच भरात-भर म्हणजे दीड वर्षापूर्वी कोरोना नामक वायरस ने संपूर्ण जगासह वणी तालुका सुद्धा हादरून गेला होता. यामध्ये वणी येथील पोलीस निरीक्षक वैभव जाधव व पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे शाखेचे गोपाल जाधव या जोडीने संपूर्ण वणी शहरात भुकेल्यांना अन्न आणि गरजवंतांना निवारा पुरवण्याचे कार्य करून ,संपूर्ण महाराष्ट्रासह ,यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पोलीसातील देवदूत काय असतो..! हे दाखवून दिले .जाधव जोडीच्या कार्य-काळात अट्टल गुन्हेगारांना प्रशासन काय आहे हे दाखवून दिले. संपूर्ण शहरातील गुन्हेगारी टक्केवारी कमी करून, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे नाव संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सुवर्ण अक्षरात कोरले, आज दिनांक 30 ऑगस्ट सोमवारला पोलीस निरीक्षक वैभव जाधवसह संपूर्ण पोलीस विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांना पुष्पगुच्छ व शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून, त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक वैभव जाधव रत्नपाल मोहाडे ,सुधीर पांडे,पत्रकार निलेश अ. चौधरी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©