मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय येथिल विद्यार्थीनी कु. कोमल सुरेश मेश्राम हिने चौधरा ग्रामपंचायत येथील बरबडा गावातली शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना शेतात विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्याक्षिक व मार्गदर्शन केले. कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी करता वेळी कोण-कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.फवारणी करताना संरक्षण कपडे घालावेत, नाका व तोंडावर मास्क वापरावा, फवारणी करताना औषधी अंगावर येणारं नाही याची काळजी घ्यावी, औषधी बाॅटल खोलत असताना तोंडाने न उघडता अवजारांचा वापर करावा या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे (प्राचार्य ) डॉ.आर. ठाकरे सर, (उपप्राचार्य) मंगेश कडू सर, (कार्यक्रम अधिकारी) शुभम सरप सर, (विषय तज्ञ ) डॉ.प्रतीक बोबडे सर,श्रेयशा वानखडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच कार्यक्रमाला गावातील शेतकरी राजू राऊत, गजू राऊत उपस्थित होते…
