पालकांचे वरिष्ठांना निवेदन सादर
मौजा बोटोणी येथील स शि दिवाकर राऊत यांची शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी शाळेत मद्य पीऊन होते अशी तक्रार दि 9 आँगस्ट ला केली दि 6 आगस्ट ला दिवाकर राऊत स शि हे दारु पिऊन अध्यापण करीत होते असा आरोप केला आहे , पण त्या दिवसी कोणतेही पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळेत आले नाही दुसर्या दिवशी विद्यार्थी यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन तक्रार करण्यात आली दिवाकर राऊत यांनी शाळा डिजिटल केली सुंदर बालोद्यान केले परीसर स्वच्छता तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी गेल्या 15वर्षापासून ते धडपड करतात शाळेचा विकास व्हावा या साठी ते नेहमी तत्पर असतात गावातील चांगले नागरीक व पालक यांची त्यांच्या बद्दल चांगली भावना आहे पण काही राजकीय व्यक्ती विनाकारण त्यांची दरवर्षी तक्रार करतात शाळा व्यवस्थापन समिती हि शाळेला मदत करण्यासाठी असते पण तसे होताना दिसत नाही दिवाकर राऊत सर यांच्या वर कोणतीही कारवाई करु नये अशी मागणी महादेव सिडाम इतर 25 लोकांनी मा गट विकास अधिकारी प स मारेगाव यांचे कडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे
