Home यवतमाळ इनरव्हील क्लब दिग्रस 303 च्या वतीने दिग्रस पोलीस बांधवांना राख्या बांधून दिल्या...

इनरव्हील क्लब दिग्रस 303 च्या वतीने दिग्रस पोलीस बांधवांना राख्या बांधून दिल्या शुभेच्छा, तसेच विडिओ कॉन्फरन्स द्वारे देशाच्या सैनिका सोबत साधला सवांद.

15

दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये इनरव्हील क्लब 303 च्या वतीने आज रक्षाबंधन चे अवचित साधून संपूर्ण पोलीस बांधवाला,व देशाचे सैनिक असलेले व सद्या सुट्टीवर आलेले कोब्रा कमांडो गौतम धवणे यांना राख्या बांधून रक्षाबंधन च्या शुभेच्छा दिल्या व सोबतच त्यांची नेहमी रक्षा कराल अशी अशा वेक्त केली.डोळ्यात तेल घालून भारत देशाचे रक्षण करणारे बहादूर सैनिक रक्षाबंधन च्या दिवशीं पण आपल्या कुटूंबा पासून लांब असतात, त्यांना पण आपल्या कुटूंबातील बहिणीची या दिवशी आठवन येते, पण त्यांची आठवण ठेवत त्यांना राख्या पाठविण्याचे उत्कृष्ट काम दिग्रस च्या भगिनीने केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून इनरव्हील क्लब 303 दिग्रस या संस्था च्या माद्यमातून दरवर्षी रक्षाबंधन च्या दिवशीं देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्याचे काम इनरव्हील क्लब दिग्रस 303 च्या भगिनी करीत आहेत. यंदा कोरोनाचे संकट, आणि लाॅकडाउन असल्यामुळे या भगिनीने देशाच्या सैनिक असलेले कोब्रा कमांडो 203 बटालियन झारखंड येथे पोस्टद्वारे राख्या पाठवून संपूर्ण देशाचे, व सोबतच संपूर्ण जनतेचे आपण रक्षा करत आहात, आपण आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. व विडिओ कॉन्फरन्स द्वारे कोबरा बटालियन च्या जवानां सोबत संवाद साधून या भगिनीने त्यांचे आभार मानले व रक्षाबंधनाच्या शुभेच्या दिल्या.त्यांचे हे उपक्रम पाहून 203 कोब्रा कमांडो च्या वतीने सर्टिफिकेट देण्यात आले.
सैनिकांला फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले कि त्यांचे आत्मबल वाढत असते राखी म्हणजे केवळ रेशम धागा नाही तर त्या धाग्या पासून सैनिकांना ऐक वेगळी शक्ती मिळत असते, अशी प्रतिकिया 203 कोब्रा कमांडो चे मेजर धरमवीर सिंह व मेजर रामेश्वर यादव, मेजर शोभाराम यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे दिली.
या वेळी दिग्रस पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री सोनाजी आमले, PSI बोरकर, PSI नावकर व कोब्रा कमांडो गौतम धवणे व इतर पोलीस बांधव उपस्थित होते.
त्यावेळी इनरव्हील क्लब दिग्रस च्या अध्यक्षा सौ आरती तायडे सचिव सौ प्रणिता आसेगावकर, अर्चना पाटील, संजिवनी कोळसे, हेमा अग्रवाल, साइन ढोसानी, शितल निमोदिया, कोमल हसबे, छाया आडे, गौरी बनगिनवार, व इतर भगिनी उवस्थित होत्या.

Copyright ©