जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2155 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 23 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात आठ व जिल्ह्याबाहेर एक अशी एकूण नऊ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 393 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 391 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72832 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71036 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 13 हजार 984 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 40 हजार 980 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.20 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.51 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2155 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2155 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 769 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________
एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्काराठी
माजी सैनिक पाल्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ दि. 23 ऑगस्ट : शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर गौरव पुरस्कार रु.पाच हजार विशेष गौरव पुरस्कार वितरीत करण्यात येतो.
सदर पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्यांनी आपले अर्ज सबंधीत कागदपत्रासह दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे पाठवावे. जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07232-245273 यावर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.



