Home यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षका सह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

यवतमाळ जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षका सह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

10

———————————————
यवतमाळ- अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षकानी कार्यरत ठिकाणचा कार्यकाळ संपुष्टात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षकासह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे परिक्षेत्रातील जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये बाभुळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची बदली बुलढाणा येथे करण्यात आली आहे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन बाळकृष्ण कोयल यांची अमरावती ग्रा. राजु साळवे यांची अमरावती ग्रा. योगेश सुखदेव इंगळे यांची वाशिम, गोविंदा शामराव पांडव यांची अकोला, विजय प्रकाशराव चव्हाण यांची अकोला, कैलास दत्तू भगत यांची अकोला, ब्रिजपालसिंह राजपालसिंह यांची अकोला, नंदकुमार दशरथ आयरे यांची बुलढाणा, संदीप प्रभाकरराव चव्हाण यांची अमरावती ग्रा. राहुलकुमार राऊत यांची अमरावती ग्रा., अमोल प्रभाकर बारापत्रे यांची बुलढाणा, तर संजय शिवकाळ शिपणे यांची वाशिम येथे करण्यात आली असून जिल्ह्याला बाहेर जिल्ह्यातून यापैकी निम्मेच मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा तुटवडा जाणवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Copyright ©