Home यवतमाळ पार्डी नस्करी च्या शाळेत covid-19 च्या नियमांचे उल्लंघन

पार्डी नस्करी च्या शाळेत covid-19 च्या नियमांचे उल्लंघन

11

——————————————–
मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभाराने सर्वच त्रस्त
——————————————–

घाटंजी-
शासकीय आदेशानुसार दि. १५ जुलै पासून इयत्ता ते 8 वी ते १० वीचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र असे असले तरी कोव्हीड अधिनियमानुसार कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना न केल्यामुळे, त्यातच विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती राहत असल्या कारणाने एकाच डेक्स वर एकच विद्यार्थी बसविण्या ऐवजी तीन तीन विद्यार्थी बसविण्यात आल्याने कोव्हीड च्या नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. प्रभारी मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभार नुसार पुन्हा गावात कोरोणाचा प्रसार होतो की काय? अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना नियम व अटींचे पालन करण्यासंदर्भात विद्यालयातील संजय चंदनकर नामक शिक्षकाने नियमाचे पालन करण्याचा अट्टाहास केला असता विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून त्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न आज तिथे होताना दिसून येत आहे.

पहिल्याच दिवसा – पासून जवळपास ७५%, विद्यार्थी नियमीत शाळेत येत आहेत. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस जे पवार असून शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी, शाळा सुरु झाल्यानंतर दैनंदिन करावयाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण इत्यादींना बगल देवून शाळा सुरु करण्यात आली. शाळा सुरु करण्यापूर्वी वर्ग खोल्या, कार्यालय, शिक्षकांची स्टाफ रूम यांची साधी स्वच्छता सुद्धा करण्यात आली नाही, निर्जंतुकीकरण तर दूरच राहिले.
शिक्षकांना स्वतः हातात झाडू घेवून स्टाफ रूम स्वच्छ करावी लागली. शाळेत पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांना वारंवार हात धुवावे असा शासनाचा आदेश असतांना शाळेत हात धुन्यासाठी सुद्धा पाणी नाही. तापमान व ऑक्सीजन पातळी दररोज मोजून त्यांची नोंद ठेवण्याचा शासकीय आदेश असतांना ही शाळेत याची किंचीतही अंमलबजावणी होतांना दिसत नाही.

शाळेचे मुख्याध्यापक सु. जे. पवार यांनी सर्व शिक्षकांना खोटी माहिती देवून अध्यापन करण्याचे आदेश दिले. पार्डी (न.) व भांबोरा येथील ग्रामपंचायतचे ठराव मी घेतले आहे असे खोटे सांगून शिक्षकांना जबरदस्तीने वर्गावर जाण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात त्या कालावधीत दोन्ही ग्रामपंचायतचे ठराव मिळालेले नव्हते तसेच ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची समिती सुद्धा गठीत करण्यात आली नव्हती.

थोडक्यात काय तर मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार सुरु आहे. शाळेतील एक शिक्षक संजय चंदनकर यांनी मुख्याध्यापक सु. जे. पवार यांना कोवीड-१९ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्या बाबत वारंवार सांगितले. परंतू मुख्याध्यापक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. उलट मुख्याध्यापकाणे विध्यार्थी व त्यांच्या पालकांना संजय चंदनकर ची माझ्याकडे तक्रार द्या मी त्याच्यावर कारवाई करतो, असे पालकांना घरी जाऊन चिथावणी देत असल्याचे
शिक्षक संजय चंदनकर यांचे म्हणणे आहे.

मुख्याध्यापकाचा वर्गावर पाठविण्याचा दुराग्रह पाहून संजय चंदनकर यांनी पार्डी (न) च्या सरपंचा अलका देवतळे यांना ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन भेटले व झालेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्या प्रत्यक्ष शाळेला भेटण्यासाठी आल्या असता ९ व १० वी मध्ये प्रत्येक बाकावर प्रत्येकी दोन ते तीन विद्यार्थी बसल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले तसेच
लगतच्या भांबोरा गावाचे नवनिर्वाचित सरपंच कुणाल राठोड यांनीही शाळेला भेट दिली व शाळेचे निरीक्षण केले. सोबत आलेले ग्रा.पं. सदस्य भारत पुसनाके यांनी ९ वी व इ. १० वी मध्ये जाऊन दाटीवाटीने बसलेल्या विद्यार्थ्यांचे फोटोही काढले व लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तेही हवेतच विरले.

सर्व शिक्षक शिकवितात पण चंदनकर सर शिकवित नाही ? हा शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न परंतु यात त्यांची काहीच चूक नाही. शाळा प्रमुख या नात्याने विदयार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मुख्याध्यापकांचे काम पण तेच जर पालकांना आणि विध्यार्थ्यांना चुकीचे मार्गदर्शन करीत असतील तर न्याय मागावा तरी कुणाला?

सदर प्रकरण अतिशय गंभीर असून पार्डी व भांबोरा गावाचे सरपंच ग्रामसेवक, पटवारी केंद्र प्रमुख तसेच व गटविकास अधिकारी यांनी गांभीर्याने या प्रकरणाची चौकशी करून बेलगाम मुख्याध्यापकाच्या बेकायदेशीर स्वैराचाराला आळा घालावा अपेक्षा व्यक्त होत आहे.

Copyright ©