शहरापासून 3 की. मी. अंतरावर असलेल्या पारधी बेडा ( काठोडा ) येथून पोलीस पथकाने सुका गांजा व गांज्याची झाडे असा एकूण 66 हजाराचा माल ताब्यात घेतला. ठाणेदार पीतांबर जाधव यांना पारधी बेडा येथे गांज्याची झाडे असल्याची माहिती मिळाली. या माहींतवरून ठाणेदार यानी पोलीस पथक, दोन सरकारी पंच व वजन काट्या वाल्याला सोबत घेवून घटनास्थळ गाठले. व परिसराची झडती घेतली असता तेथील दीपा श्रीराम चव्हाण या महिलेच्या घराजवळल गांज्याची झाडे दिसून आली असून ती त्यांच्याव जवळून जप्त केली. त्या झाडाचे अंदाजे वजन 9 किलो व योगिता सोनू चव्हाण या महिलेच्या घरामधून 1 किलो सुका गांजा मिळून आला. बाजारभावा नुसार या गांज्याची किंमत 66 हजार रूपये असून मुद्देमाल आर्णी पोलीसांनी जप्त केला आहे
वरील कार्यवाही आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार दिनेश जाधव नफिस शेख यांनी केली आहे



