Home यवतमाळ 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन

75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन

9

75 वा भारतीय स्वातंत्र्य दिन , खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन 380 द्वारे प्रयासवन येथे आज वृक्षारोपण करुन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी PTA तर्फे प्रयासवनला देणगी स्वरूपात ₹ 5000 देण्यात आले व कोरोना पासुन संरक्षण करण्यासाठी फेसशिल्डही देण्यात आले. डॉ. विजय कावलकर यांनी प्रयासवन चे महत्त्व या प्रसंगी उपस्थितांना सांगितले.
या प्रसंगी विदर्भ विभागीय अध्यक्ष , महाराष्ट्र प्रोफेशनल असोसिएशन योगीराज अरसोड, जिल्हाध्यक्ष संजय पवार, कोषाध्यक्ष संदीप देवपारे, संघटक मोहनसिह शेर, प्रसिध्दी प्रमुख चंद्रशेखर आष्टेकर, महीला जिल्हाध्यक्ष सौ. अस्मिता वैद्य, तालुका अध्यक्ष सौ. मेघा भास्करवार, सदस्य सौ. विद्या नरहरशेट्टीवार, संजय गावंडे, विनोद भोसले, प्रविन शेटे , हार्दिक मांडविया तर प्रयासवन तर्फे डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगिनवार व पटेल मँडम उपस्थित होत्या.
प्रकल्प अधिकारी म्हणून सौ. मेघा भास्करवार आणि सौ. विद्या नरहरशेट्टीवार यांनी कार्यक्राचे नियोजन केले..

Copyright ©