राज्या सह संपूर्ण देशात ढगफुटी ने कहर केला असतानां सरविकडे पाणीच पाणी व हिरवळ पाहण्यास मिळत आहे.मात्र बेलोरा ग्रामवाशीयांवर जनावरांनच्या चारण्याचा खूप मोठा प्रश्न येऊन पडला आहे.वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर जनावरांना चारण्यास मनाई करण्यात आली असल्याने.
आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी वन विभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बेलोरा हे गाव डोंगरदऱ्यात वसल्यामुळे साहजिकच तेथे हिरवळीचे साम्राज्य पाहावयास मिळते. यवतमाळ नजीक असलेल्या हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या या गावात मात्र हल्ली जनावरांना चराई करण्यास बंदी घातली गेली आहे.त्यामुळे गुरे,ढोरे यांना कसे जगवायचे हा प्रश्न बेलोरा गाववासियांसमोर उभा ठाकला आहे.
मौजा बेलोरा ता.जि.यवतमाळ येथे भरपूर प्रमाणात जनावरांची संख्या असल्यामुळे एवढ्या जनावरांना चराईकरिता जागा नसल्यामुळे चार्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.
सध्या यांत्रिक प्रलोभनापायी जनावरांची संख्या खूप कमी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गुरेढोरे आहेत.ते निष्ठतेने त्यांची सेवा करून जोडधंदा करतात.प्रत्येक शेतकऱ्याला आपले पशुधन जगावे,असे वाटते.जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अति महत्वाच्या गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आज निवारा हे आहेतच. मात्र शेतकऱ्याचे पशुधन जगवायचे असेल तर चारा आणि पाणी आवश्यक आहे.याचे सरळसरळ गणित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळत नसावे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तरी वन विभागामार्फत जनावरांना चारण्याकरीता जंगलाच्या काही भागात गावातील जनावरे चारण्याकरिता परवानगी देण्यात यावी. या करिता आज महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ.सागरताई पुरी, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.अंजलीताई गिरी, सुधाकर गुघाने,चंदु भारती, विनोद नेवारे, नितीन मडावी, अविनाश मारबते,संजय नेवारे, शुभम कचरे व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
