Home यवतमाळ पाकिस्तान मध्ये गणेश मूर्ती विटंबना झाल्याच्या निषेधार्थ दिग्रस तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र...

पाकिस्तान मध्ये गणेश मूर्ती विटंबना झाल्याच्या निषेधार्थ दिग्रस तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

19

 

 

श्री गणपती हे हिंदूंचे आराध्य दैवत असून हिंदू रीति रिवाजाप्रमाणे प्रत्येक हिंदू धर्मीय श्री गणेशाला प्रथम स्थान देऊन कोणत्याही शुभकार्याला आराध्य दैवत श्री गणेशा पासूनच सुरवात करतात.हिंदूंच्या प्रथम पूजनीय श्री गणपती देवतांचे पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील भोर शहरा मध्ये तेथील समाजकंटकांनी श्री गणपती मंदिराची तोडफोड करुन श्री गणपतीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली मात्र आतापर्यंत त्या समाजकंटकांवर पाकिस्तान सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.या निषेधार्थ दिग्रस  भाजपा,शिवसेना, प्रहार, पक्षाच्या कार्यकर्त्या सह शहरातील तसेच तालुक्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान सरकारचा धिक्कार असो, भारत माता की जय असे नारे देऊन दिग्रस च्या नायब तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.

Copyright ©