भिवापूर तालुक्यात सध्या जिकडेतिकडे डेंग्यूच्या रुग्ण वाढत असल्याचे आपण ऐकत आहोत. पावसाळा म्हटले की डेंग्यूचा उत्पत्तीचा कालावधी या कालावधीमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असतो. सध्या भिवापूर तालुक्यातील मालेवाडा वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. रस्त्यावर सांडपाणी काढणे व नाल्यात शितारे पाणी फेकणे. मात्र मालेवाडा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहेत प्रभाग 3 दलित मुक्ती सेना झेंडा चौक मालेवाडा येथे साचलेल्या पाण्यावर रेती चुर्री टाळण्याकडे सुध्दा मालेवाडा ग्रामपंचायत पाठ फिरवली आहे. आज मालेवाडा ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी या समस्येवर तोडगा काढायला तयार नाही. सांडपाण्यावर योग्य विल्हेवाट लावल्यावर चर्चा करायला तयार नाहीत. यामधील चित्र स्पष्ट झाले आहे मालेवाडा ग्रामपंचायतील पदाधिकारी व कर्मचारी सुस्त झोपित असून कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अखेर कधी होणार सांडपाणी बंद याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.
