ढगा पाटी ते ब्राह्मणवाडा रोडवर धाम नदी च्या ढोलापुलावर गेल्या पाच वर्षांपासून मोठे भगदाड पडले असुन रस्त्याची अवस्था दयनीय झाल्यानी या पुलावरून तसेच रस्त्याने जाणार्या नागरिकांची जनू वाटच आडविली आहे.नागरीकानी वारन्वार मागणी करुनही रस्त्यावरील पुलाला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती केल्या जात नाही.
दरसाली त्याचा आकार वाढतच जात आहे बरेचदा पुलावरून पाणी
असले तर अंदाज न आल्याने वाहन चालक यात अडकुण दुर्घटनाग्रस्त होतात हा रस्ता जंगली जरी असला तरी
आर्वी ते कोंढाळी काटोल साठी कमी
अंतराचा आहे त्यामुळे वाहनांची ये जा
बरीच असते आणी दरसाली पावसाळी दिवसात अनेक दुर्घटना इथे होतात त्यामुळे ब्राह्मणवाडा लादगड मासोद ढगा गावातील ग्रामीणाचीं मागणी आहे
आर्वीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाला याबाबत कधी जाग येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
