———————————————
यवतमाळ-: अत्यावश्यक सेवा बजावणारे रुग्ण वाहक दिवस रात्र एक करीत असताना त्यांचे भवितव्य मात्र अधांत्री पडले असल्याने त्यांच्या महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व वाहन चालक कामगार संघटनेने एन एच एम मध्ये समाविष्ट करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून १५ वर्षा पासून सेवा बजावणारे रुग्ण वाहक हे अहोरात्र मेहनत करीत आहे. रुग्ण आला की तातडीने त्याला नेणे, त्याला रुग्णालयात दाखल करणे हे नित्याचे झाले आहे. मात्र त्याची व त्याच्या परिवाराची उपजीविका कशी ही बाब कोणीच हेरून पाहली नाही. तो रुग्णवाहिका चालवितो म्हणजे याला भरमसाठ पगार असेल असा सर्वांचा समज होवून बसला आहे. मात्र उलट आहे. त्याच्या घरात अठरा विश्व गरिबी असताना तो रुग्णाला अल्प मानधनात आज ना उद्या माझे भविष्य उजळेल या स्वप्नात राहून आपली सेवा देत आहे. मात्र अजूनही शासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व कंत्राटी वाहन चालक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कैलास शेंडे, सचिव अजय देठे यांच्या नेतृत्वात शासनाचे दार ठोठावून आमचे आमचे भवितव्य धोक्यात न जावू देता. शासन तरतुदी प्रमाणे एन एच एम मध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
