मृतकाच्या पत्नीने दिली होती तक्रार
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चक्क 3 आरोपीवर झाला गुन्हा दाखल
, मारेगाव:- गेल्या आठवड्याभरा पासून बहुचर्चित असलेल्या हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी अखेर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.यात मृतकाच्या विधवा पत्नीच्या तक्रारी वरून चक्क 3 आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.यात भूमिअभिलेख कार्यालयातील एका भुमापका सह दोन पोट हिस्सेदाराचा समावेश आहे.
यात कोमल तुमस्कर (37), वासुदेव कृष्णा एकरे (71),राजु नामदेव एकरे (40) रा.हिवरा मजरा असे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतकाची मूळ शेती एका प्रकल्पात भूसंपादित झाली.व मिळालेल्या मोबदल्यातून मृतकानी मार्डी नजीक हिवरा मजरा येथे गट न.69/4 पैकी 1 हे 30 आर शेतजमीन खरेदी केली.शेताचा कायदेशीर सात बारा मृतकाच्या नावे झाला.दरम्यान मोजणी शिटमध्ये येथील भुमापकाने पोट हिस्सेदारांच्या संगणमताने घोळ केला होता.24/2/2020 ला पहिल्या मोजणीत तीन हिस्से तर दिनांक 13/8/2020 ला दुसऱ्या मोजणीत पाच हिस्से तर यामध्ये मृतकाच्या वाटयास 1 हे 30 आर ऐवजी केवळ 0 हे 40 आर इतकेच क्षेत्र मोजणी शीट मध्ये दर्शविण्यात आल्याने मृतकाला पूर्ण शेत जमीनीचा ताबा मीळाला नव्हता.तर उर्वरित क्षेत्रात पोट हिस्सेदाराने कब्जा केला होता.
मृतकाने मृत्यु पूर्वी वारंवार न्यायाची मागणी भूमिअभिलेख कार्यालया कडे केली.मात्र पिडीत शेतकऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान न्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा दिला होता.तसेच उपोषणास अडथळा केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा ही वरिष्ठाकडे पाठविलेल्या एका तक्रारीतून पिडीत शेतकऱ्यांने दिला होता. मात्र वरिष्ठानी या प्रकरणाची दखल घेतली होती.परंतु येथील कार्यालय प्रमुखाने कर्तव्याची सिमा ओलांडून वरिष्ठानच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवली.या बाबीकडे गांभीर्याने घेतले नसल्याने अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने अखेर 27 जुलै रोजी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा संपवली.
मृतक शेतकऱ्याची पत्नी मनीषा फरताडे यांनी 29 जुलै रोजी दिलेल्या तक्रारी वरून 3 ऑगस्ट च्या रात्री उशिरा परंत या प्रकरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपिवर 306,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी तपासाअंती पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात होत आहे.



