Home यवतमाळ घाटंजी येथे “सहेली फाउंडेशन” स्थापन

घाटंजी येथे “सहेली फाउंडेशन” स्थापन

15

——————————————–

महेश पवार यांच्या संकल्पनेतून तरूणींन साठीचे व्यासपीठ

—————————————-
घाटंजी- तरूणींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी घाटंजी येथे महेश पवार यांच्या संकल्पनेतून सहेली फाउंडेशन हे हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात आले. या फाउंडेशन चा मुख्य उद्देश्य व्यक्तिमत्व विकास, करिअर गाईडंस, सामाजीक उपक्रम, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आहे.
सहली फाउंडेशनचे उद्धघाटन रसिकाश्रय घाटंजी येथे संपन्न झाले. या उद्धघाटन कार्यक्रमाला नाम फाउंडेशनचे विदर्भ खानदेश प्रमुख श्री हरीष ईथापे आणि मुख्य संयोजक महेश पवार उपस्थित होते. घाटंजी सारख्या शहरामध्ये मुलींना हक्काचे व्यासपीठ नाही. त्यांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संधी नाही. मुलींना व्यक्त होता येत नाही म्हणून सहली फाउंडेशन च्या माध्यमातून तरुणींना ही संधी देण्यासाठी या फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. असे मुख्य संयोजक महेश पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आज संवाद कमी झाला आहे. त्यामुळे आपले विचार व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या सुप्त गुणांना वाव मिळेल असे कुठलेही व्यसपीठ ग्रामीण भागात नाही. त्यामुळे शहरी भागातील मुलींच्या तुलनेमधे ग्रामीण मूली विकासात्मक दृष्टिकोणातुन कमी पडतात. मात्र ग्रामीण भागातील तरूणींन मधे विविध कौशल्या असून देखील त्यांच्या साठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नसल्या मुळे ग्रामीण मूली स्पर्धे मधे कमी पडतात.
या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आर्थिक कमकूवत असलेल्या मुलींसाठी मदत करण्यात येणार आहे. बाहेर गावी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून विविध सामाजिक कार्यक्रम तरुणींच्या माध्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहीती महेश पवार यांच्या मार्फत देण्यात आली.

Copyright ©