Home Breaking News मारेगाव भुमीअभीलेखच्या उपअधिक्षकास अटक करा

मारेगाव भुमीअभीलेखच्या उपअधिक्षकास अटक करा

14

……………………………
शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांची जिल्हा पोलीस अधिक्षकांना सुचना
………………………………….

तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकऱ्यानी २७ जुलैला भुमीअभिलेख कार्यालयाच्या भोगळ कारभाराला कंटाळून विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली, त्या घटनेची गंभीर दखल घेत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ना. किशोर तिवारी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला दि. २ ऑगष्टला भेट देऊन घटनेचा आढावा घेत, यात सदोष मोजनी शिटमुळे सदर शेतकऱ्यानी कंटाळून आत्महत्या केल्याने मृतक शेतकऱ्यानी केलेल्या तक्रारीच्या कागदपत्राच्या पाहणीत दौऱ्या दरम्यान शंका व्यक्त करित यवतमाळचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . दिलीप भुजबळ यांच्याशी किशोर तिवारी यांनी दुरध्वनीवरून संवाद साधत मारेगाव येथील भुमीअभिलेखचे उपअधिक्षक पवार यांना अटक करण्याच्या सुचना केल्या, आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवा महिलेस किशोर तिवारी यांनी मंगळवारला पांढरकवडा येथे साडी चोळी व १० हजार रुपये रोख देऊन सन्मान करण्यात आला.
हटवांजरी येथील देवराव फरताडे या शेतकऱ्याने दि. २७ जुलैला भुमीअभिलेख कार्यालयातील सदोष मोजणी शिट मुळे नविन शेत घेतलेल्या मोजणीत कर्मचाऱ्यानी घोळ घातल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाने हतबल होऊन तननाशक विषारी औषध प्राशन करुन जिवनयात्रा संपविली, या घटनेची दखल घेत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री किशोर तिवारी यांनी आत्महत्या घटनेची दखल घेत २ ऑगष्ट ला हटवांजरी येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले, आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या घरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने किशोर तिवारी यांनी अधिकाऱ्याना धारेवर धरत कर्तव्याची जाणीव करून दिली, लगेच मारेगाव येथील भुमीअभिकार्यालयात शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भेट देऊन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांची खरडपट्टी काढत, शेतकरी आत्महत्तेला तुम्हीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत, मंगळवार ला पांढरकवडा येथे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष मा. किशोर तिवारी यांनी आत्महत्या झालेल्या देवराव फरताडे यांच्या पत्नीचा साडी चोळी व १० हजार रुपये रोख देऊन सन्मान केला, त्यावेळी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी भुमी अभिलेखचे उपसंचालक शिरोळकर यांच्याशी या आत्महत्या संदर्भात दुरध्वनीवरून संवाद साधून प्रकरणाची योग्य चौकसी करा , तसेच यवतमाळ चे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप बुजबळ यांना मारेगाव भुमी अभिलेख चे उपअधिक्षक पवार यांना दोषी पकडत अटक करण्याची सुचना शेतकरी मिशनचे किशोर तिवारी दिली,मारेगांव येथील भुमि अभिलेख कार्यालयात भेटी दरम्यान उपस्थित नागरीकांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्या प्रति रोष व्यक्त केला हे विशेष.

Copyright ©