शिवसेना पक्ष प्रमुखांच्या संकल्पनेतील ,शिवसंपर्क अभियानात जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या झंझावाती ५० बैठकीचा ,शेतकरी मंदिर येथे समारोप
शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ,शिवसंपर्क अभियान जिल्हा प्रमुख तथा मा.आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी व आर्णी विधानसभेत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानाला प्रेरीत होऊन ,हजारोंच्या संख्येने युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसंपर्क अभियान हे नवसंजीवनी देणारे ठरले असे संपुर्ण जिल्ह्यातून बोलले जात आहे.
यावेळी वणी व आर्णी विधानसभेत कुठल्याही पाण्या-पावसाची हयगय न-करता जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी झंझावाती ५० बैठकी घेत, शिवसैनिकाचे रक्त किती प्रमाणात सळसळत असत हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखविले. या अभियानाचा समारोप शेतकरी मंदिर येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजयानंद पेंढणेकर यांच्या उपस्थित हजारो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.या समारोपीय कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजयानंद पेंढणेकर, जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार विश्वास नांदेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगमवार, उपजिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार, तिरुपती कंदकुरिवार, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, वणी विधानसभा संपर्कप्रमुख संतोष माहुरे, गणपत लेडांगे, बाळू सोमलकर, उपशहर प्रमुख महेश चौधरी, अनुप चटप ,अजय नागपुरे, प्रशांत बलकी, अजय चन्ने, युवासेना शहरप्रमुख बंटी येरणे, नीलेश करडभुजे, चंद्रकांत घुगुल व हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संचालन अजय नागपुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणपत लेडांगे यांनी मानले. या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत गावा-गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कृषी कर्ज, कोविड लसीकरण बाबतही आढावा घेण्यात आला व प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक, भावा प्रमाणे खंबीर उभा राहिल व शिवसंपर्क अभियान राबवितांना , प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन करुन व सोशील डिस्टसिंग पाळत अभियान यावेळी पुर्ण करण्यात आल्याचे समारोपीय कार्यक्रमांत सांगण्यात आले.
