संचारबंदीत शितिलता होताच एस टी महामंडळाने टप्या-टप्यात बस सेवा सुरु केल्या परंतू चागल उत्पन्न देणार्या जामानि,आकोली,मदनी,माळेगाव (ठेका)मार्गानी अजुनपर्यंत बस सेवा सुरु केलेली नसल्यामुळे आचर्य व्यक्त होत आहे.त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे व दुप्पट पैसे मोजा लागत असुन प्रवाशांना भुर्दड सहन करावा लागत आहे.
संचारबंदी पुर्वी या मार्गावर दिवसाला सहा बस फ़ेर्या सुरु होत्या मात्र आता एकही बस फेरी सुरु नाही आहे.परिसरातील जवळपास दहा ते पंधरा गाव या मार्गाला जोडलेली आहे या गावातील प्रवाशांना बसेस चा फायदा होत होता संचार बंदीत इतर मार्गासह या मार्गावरील बस सेवा बन्द करण्यात आली. शितिलते नत्तर उशिरा या मार्गानी काहि दिवस दोन टाईम बस सेवा सुरुही करण्यात आली मात्र काही दिवसच सुरु राहाली परिसरातील नागरिकानसाठी वर्धा ही बाजार पेठ येते त्यामूळे नियमित वर्धा या ठिकानी जावे लागते व परिसरातील वृधना व महिलना ब्यँकेच्या व्यवहारासाठी सुकली (बाई)किवा येळाकेळी या ठिकानी जाव लागत मात्र बस सेवा बन्द असल्या कारणानी खाजगी वाहनांचा आधार घेऊन अडगळीत प्रवास करावा लगतो प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणार्या एस टी महामंडळाचा खडतर प्रवास सुरु आहे.ग्रामीन भागातील बस फर्या महामंडळानी सुरु केल्या आहे मात्र आकोली ते माळेगाव मार्गानी अजुन्पर्यंत एकही बस फेरी सुरु झालेली नाही कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात एस टी ची चाक जागीच थाम्बल्यामूळे परिसरातील नागरिकांना मोट्या अदचनिचा समान करावा लागला आहे परिसरातील नागरिकांनकडून बस सेवा सुरु करण्याची मागणी होत आहे.
