Home यवतमाळ शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा

शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा

32

 

झरी – मुकुटबन येथे सुशिक्षित बेरोजगार युवक यांनी ता. 2 ला मुकुटबन येथे बस स्थानकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बेरोजगारांच्या हक्का साठी झरी तालुक्यातील युवक सर्व युवक एकत्र येऊन या आमरण उपोषणात सहभागी झाले आहे.

झरी तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक नामाकित मोठं मोठ्या कंपन्या आल्या आहे. व त्याचे कामही जोरात चालू आहे मात्र तालुक्यातील युवकाच्या हाताला मात्र अजूनही त्या कंपनीत कुठल्याच प्रकारचे काम मिळत नाही आहे त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित युकव वर्ग हा मात्र कामापासून वंचित आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व युवक एकत्र येऊन त्या कंपनीमध्ये अनेक वेळा काम मागितले मात्र त्यांना त्या ठिकाणी काम मिळत नाही आहे असे चित्र आज तालुक्याचे दिसून येत आहे त्यामुळे सुशिक्षित युवकांना आज उपोषणाची वेळ आली आहे त्या साठी मुकुटबन येथे युवक हे आमरण उपोषण करत आहे त्याच्या उपोषणाला आज शीवक्रांती कामगार संघटनेने देखील आपला पाठिबा दिला आहे.

Copyright ©