Home यवतमाळ मंगरूळ येथून २ किमी.अंतरावर असलेल्या हेटी( साकूर ) येथे डॉ. अण्णाभाऊ साठे...

मंगरूळ येथून २ किमी.अंतरावर असलेल्या हेटी( साकूर ) येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

11

 

डॉ. अण्णाभाऊ साठे एक उत्तम साहीत्यीक व शिवशाहीर परागभाऊ पिंगळे जिल्हा प्रमुख शिवसेना साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी कथा , कादंबरी नाटके , लोकनाट्य , कविता , पोवाडे, प्रवासवर्णन इ.साहीत्याची निर्मीती केली.
मराठी साहीत्याला कथेपासून प्रारंभ झाला.आधुनिक मराठी कथा , वाङमयाला गोष्टींपासून प्रारंभ झाला.
कथा, पोवाडे, लावणी, वगैरे च्या माध्यमातून प्राचीन काळी कथा प्रकट होत होती.
अण्णाभाऊ साठे हे जीवनवादी साहीत्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी फुले , शाहु, आंबेडकर यांच्या साहीत्याचा अभ्यास करुन त्यांच्या लेखनाची दिशा निश्र्चित केली. गिरणी कामगाराचे नेतॄत्व केले तसेच ” फकीरा ” या कादंबरीचे लीखाण करून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली.
आज त्यांच्या विचार हे काळाची गरज असल्याचे मनोगत मा. परागभाऊ पिंगळे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मा. संतोष भाऊ ढवळे यांनी आपले विचार व्यक्त करताना अण्णाभाऊंच्या साहीत्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमा करिता विशेष उपस्थिती -:मा. परागभाऊ पिंगळे, जिल्हा प्रमुख शिवसेना ,श्री. मांजरेकर सर विधानसभा संपर्क प्रमुख, संतोषभाऊ ढवळे , शिवसेना सहसंपर्कप्रमुख विधानसभा , किशोर इंगळे , गजानन डोमाळे उपजिल्हाप्रमुख , संजय रंगे तालुका प्रमुख , सौ.कांताताई संजय कांबळे सभापती पंचायत समिती यवतमाळ , सागरताई पुरी , अशोकभाऊ पूरी , गजानन पाटील सदस्य पं.स. , गणेश आगरे, चंद्रकांत उडाखे. धिरज निंबाळकर सरपंच , सुनिल डीवरे , अंजलीताई गिरी ता. महीला संघटिका , विजय इंगळे युवासेना ता. प्रमुख , संजय कांबळे जिल्हा संघटक शिवसेना प्रणित भिमशक्ती आघाडी, गजानन राऊत विभाग प्रमुख , सैयद अशपाकभाई , शाम गजभार पो.पा. साकुर व गावकरी बंधुभगिनींच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रम संपन्न झाला.

Copyright ©