Home यवतमाळ घाटंजी येथे अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी

घाटंजी येथे अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी

9

———————————————
घाटंजी- आज दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोज रविवार ला विद्रोही साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर उपेक्षित मजूर,कामगार वर्गांसाठी आंदोलन घेऊन अहोरात्र झटणारे सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे झोपलेल्या लोकांना जागे करणारे अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीदिन युवा पुरोगामी विचारमंच व भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम अण्णा भाऊ साठे यांच्या घाटी परिसरातील प्रतिमेला माळी समाजाचे ता.अध्यक्ष शंकर लेनगुरे व विद्यमान नगरसेवक विजय रामटेके यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.सर्वच मान्यवरांच्या हस्ते दिपबत्ती व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कमलदास मुनेश्वर यांनी अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत युवकांनी सामाजिक कार्यात पुरोगामी विचारांचा महापुरुषांचा बोध घेऊन पुढं यायला पाहिजे अस मत व्यक्त केलं, त्याचबरोबर प्रकाश वावरे ता.संयोजक भारत मुक्ती मोर्चा यांनी अण्णा भाऊ यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर त्यांचं शैक्षणिक सामाजिक कार्य यावर उजाळा देण्यासाठी “ये आझादी झुठी है देश की जनता भुकी है” अस ब्रीद वाक्य वापरून प्रकर्षाने स्वातंत्र्याच्या 74 वर्षात आजही दिसून येत आहे. त्यासाठी उपेक्षित समाजाने सतर्क राहणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.त्यावेळी गजानन मडावी,सुरेश जाधव,आकाश बुर्रेवार (माऊली बहु संस्था),रंजित नगराळे,प्रफुल राऊत,भाविक भगत,प्रेम बिसमोरे,सुनील अवचारे,तेलंगे,आकाश गायकवाड,उमेश घरडे,प्रशिल ढोके,यादी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन युवा पुरोगामी विचारमंच चे भाविक भगत यांनी केलं असून कार्यक्रमाचे संचालन गजानन मडावी सर यांनी तर आभार उमेश घरडे यांनी मानले.

Copyright ©