Home यवतमाळ रि.पा.ई (आठवले) च्या तालुका अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी केले विधुत वितरण कंपनी...

रि.पा.ई (आठवले) च्या तालुका अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी केले विधुत वितरण कंपनी विरोधात बांगडी,चोळी आंदोलन

15

 

विद्युत वितरण कंपनीची पोलीस प्रशासनाने राखली ला..

साडीचोळी बांगड्या च्या आंदोलनाची धास्ती घेऊन उपअभियंता अनुपस्थित होते

विद्युत वितरण च्या नाहक त्रासाला तसेच विद्युत वितरणच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या मुजोरी ची दखल घेत.दिग्रस चे रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी 30 जुलै रोजी साडीचोळी बांगड्यांचा आहेरचे आगळ्यावेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून विद्युत वितरण ची मुजोरी हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र कोविंडचे निर्बंध असल्यामुळे मर्यादित स्वरूपाचे आंदोलन विद्युत वितरनच्या कार्यालयाच्या.दर्शनी भागावर समोरील गेटवर प्रतीकात्मक फलक लावून आंदोलन करण्यात येऊन विद्युत वितरण चा नागरिकांना होणारा नाहक त्रास वारंवार लाईन बंद होणे,विना रीडिंग चे बिल नागरिकांना देणे,तसेच सामान्य नागरिकांना अवरेज बिल देऊन वर्षानुवर्षे मीटर बदलून न देणे, वसुली दबंग गिरी ने करणे, बिलासंदर्भात दुरुस्ती करायची असल्यास विद्युत वितरण च्या अधिकाऱ्यांची मुजोरी ऑनलाईन करावी लागते व ते वरून प्रॉब्लेम आहे असे सांगून मोकळे होणे अशा अनेक कारणांमुळे रिपब्लिकन पार्टी च्या आठवले गटाचे तालुका अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी या संदर्भात साडी चोळी सह बांगद्या देऊन आंदोलन करीत असल्याचे जाहीर करताच. विधुत वितरण कंपनी वर नामुसकी ओढवल्या जाईल या विषयाची जाणीव ठेवून विधुत वितरण ने अश्या साडी चोळी चा जर आहेर झाल्यास नामुसकी ओढवल्या जाईल यामुळे विद्युत वितरणनेही पोलीस प्रशासनास लेखी स्वरूपात आंदोलनाची माहिती दिल्याने पोलीस प्रशासनाणे छावणी स्वरूपात सुरक्षा देऊन विद्युत वितरणच्या आवारा बाहेरच साडीचोळी व बांगडया हस्तगत करून.धर्मराज गायकवाड यांना आत प्रवेश दिला व विधुत वितरण च्या सहाय्यक अभियंताअ यांच्या सोबत समाधानकारक चर्चा करून सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न विद्युत वितरन च्या अधिकाऱ्यांकडून ठाणेदार आम्ले यांच्या समक्ष अश्वशीत करण्यात आले

Copyright ©