Home Breaking News गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले झाले आहेत.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले झाले आहेत.

15

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 362 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 360 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 15 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72805 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71004 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद येथील एक व राळेगाव येथील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 615 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 27 हजार 768 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.55 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2156 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 18 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2156 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 5 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 750 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©