राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हा समन्वयक (रोजगार)पदावर दिग्रस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रोहन सदानंद आठवले यांची दिनांक 26 जुलै 2021 रोजी उपरोक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने तसेच राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या संमतीने राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाच्या रोजगार उपक्रमाच्या जिल्हा समन्वयकाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्हा समन्वयक (रोजगार) पदावर रोहन सदानंद आठवले यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मनोहरराव नाईक, आमदार इंद्रनील नाईक ,माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, वसंतरावजी घुईखेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश बोबेडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू असे नवनियुक्त जिल्हा समन्वयक रोहन आठवले यांनी सांगितले
