Home यवतमाळ युवकानी खेळामधून करियर सोबत उद्योजक बनावे- डॉ सुरेश देशपांडे

युवकानी खेळामधून करियर सोबत उद्योजक बनावे- डॉ सुरेश देशपांडे

11

 

“करिअरमध्ये खेळही महत्त्वाचे” या विषयावर वेबिनारचे आयोजन

टोकियो ऑलिंपिक 2020 च्या निमिताने भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचा उपक्रम

 

अमरावती, दि २१- करिअर घडविण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबर खेळाचेही महत्त्व आहे. यासाठी प्रत्येकाने खेळाची कास धरणे जरुरीचे आहे असे प्रतिपादन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक डॉ सुरेश देशपांडे यानी केले. भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने “करिअरमध्ये खेळही महत्त्वाचे” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

डॉ देशपांडे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात सक्रिय राहण्यासाठी खेळाला पर्याय नाही. आजकाल आपण मोबाइलमुळे शारीरिक श्रम विसरलो आहोत. प्रत्येकानी कोणतातरी एक खेळ निवडला पाहिजे आणि त्यामध्ये रोजगार अथवा व्यवसाय निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. खेळाडू हा जीवनातील कोणताही आघात सहन करू शकतो व अवघड परिस्थितीतून लवकर सावरतो. खेळाकडे बघणे म्हणजे ध्येयाकडे बघणे. युवकाना खाजगी व शासकीय संस्थामध्ये स्पोर्ट्स पत्रकारिता, स्पोर्ट्स व्यवस्थापक, इंसट्रकटर, क्रीडा अधिकारी, स्पोर्ट्स फिजिशयन यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये करियरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

डॉ देशपांडे पुढे म्हणाले आपल्याकडे खेळले जाणारे खेळ जसे बडमिंटन, हॉकी, कब्बडी, अथलेटिक्स, बास्केटबाल, टेबल टेनिस अश्या सर्व खेळाना लागणारे साहित्य आपण आपल्या देशामध्ये निर्मिती व पुरवठा करून उद्योगशील होऊ शकतो. खेळाला जीवंत ठेवण्यासाठी व खेळाडूना प्रोहत्सान देण्याकरीता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थाना पुढाकार घेऊन प्रत्येक गल्ली व सोसायटीमध्ये क्लब हाउसची स्थापना करण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला आणि आभार सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव यानी केले.

वेबिनारचे प्रसारण प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या MAHAROB यूट्यूब वाहिनीवर करण्यात आले होते. वेबिनार मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

Copyright ©