डोंगरखर्डा स्व.प्रल्हादभाऊ झाडे यांचा स्मृती प्रित्यर्थ ग्रामपंचायत सदस्य कुणाल पंचबुद्धे यांचे मार्गदर्शनाखाली येथील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना ,छत्री साहित्याचे वाटप २० जुलै रोजी करण्यात आले. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ऊन व पाऊस तसेच कोरोनाच्या कठिण काळांमध्ये अविरत काम करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन न्यू फ्रँड्स गणेशोत्सव मंडळ डोंगरखर्डा यांच्या वतीने साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील अंगणवाडी परिसरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी न्यू फ्रेड्स गणेशोत्सव मंडळ डोंगरखर्डा, ग्रामपंचायत सदस्य कुणाल पंचबुद्धे, प्रणय काळे, सौरव लडके, विक्रांत पंचबुद्धे, अविनाश इंगळे, तेजस पंचबुद्धे, जगदीश पांडे, मोहित शेंडे, वैभव इंगळे, मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
