यवतमाळ आजच्या या प्रगतशील युगात जी मुलं दहा मिनिट एका जागेवर राहू शकत नाही अशा परिस्थितीत श्री नंदानु योग केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दोन ते नऊ तासापर्यंत स्थिर राहून बनवले 17 वर्ल्ड रेकॉर्ड या कोरोना महामारी च्या काळात शाळा कॉलेजेस बंद आहे या लॉकडाउन मुळे सर्व मुले त्रस्त झाली आहेत आणि इतके तिकडे टाईमपास करत आहे अशा परिस्थितीत यवतमाळमध्ये चार वर्षापासून कार्यरत असलेल्या श्री नंदानु केंद्राने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मुलांना योगाचे प्रशिक्षण दिले व 25 मार्च ते 30 मार्च 2021 दरम्यान झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट मध्ये 13 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता व दोन ते नऊ तासापर्यंत एकाच स्थितीत न हालता स्थिर राहून एकूण 17 वर्ल्ड रेकॉर्ड यवतमाळ शहराला मिळवून दिले ही यवतमाळ शहरासाठी खूप आनंदाची बाब असून शहरवासीयांना आपल्या शरीर स्वास्थ्य रक्षणासाठी किंवा शारीरिक मानसिक अध्यात्मिक अधिक व सामाजिक विकासासाठी योग योग विना मार्ग नाही असा संदेश केंद्राच्या मुलांनी यवतमाळ शहरवासियांना दिला , तसेच फक्त शरीराला मजबूत करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा व्यायाम आपण करू शकतो पण जर आपल्याला शरीरा सोबतच आपल्या मनाला , बुद्धीला मजबूत करायचं असेल तर योग विना दुसरा पर्याय नाही असे केंद्राचे संचालक प्रेम सर यांनी पत्रकारांना सांगितले…
सोबतच सर्व विद्यार्थ्यांचे व श्री नंदानु योग केंद्राचे संचालक श्री प्रेम सर यांचं संपूर्ण शहरवासीयांन कडून व पालकांकडून भरभरून कौतुक होत आहे
भूमी श्याम जयस्वाल :- सुप्त भद्रासन 9 तास, परी आनंद जयस्वाल :- पवन मुक्तासन 6 तास, स्तुती बजाज :- अर्धमच्छेंद्रासन 4 तास, मनस्व गाढवे :- अर्धमच्छेंद्रासन 3 तास 30 मिनिट, पलक जयस्वाल :- सुप्तवज्रासन 3 तास, मिहिका पिंजरकर :- पवन मुक्तासन 3 तास, शुभ्रा कोलवाडकर :- अर्ध राजकपोट आसन 3 तास, आनंदी गणेश जोध :- गोरक्षासन 2 तास, नफिसा युसुफ बोहरा :- शिरसासन 1 तास, महक जयस्वाल :-पूर्ण भुजंगासन 2 तास, विधी कडू :- वज्रासन योगमुद्रा 2 तास, विराज देशमुख :- पश्चिमोत्तानासन 2 तास 30 मिनिट, प्रथम जयस्वाल :- पवनमुक्तासन 2 तास यांनी कौतुकास्पद 

