घाटंजी तालुक्यातील:सायफळ येथे कालरात्री एक वाजताच्या सुमारास मोठ्या सोसाट्याचा वा-यासह आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात सायफळ ते गोविंदपूर रस्त्यावर झाडे पडले असून वाहन धारकांना वाहने बाजूने काढणे मोठे अवघड झाले आहे सायफळ येथे विद्युत चे चार खांब रस्त्यावर च पडल्याने काही तास रस्ता बंद च होता सायफळ हे गाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असल्याने शासनाचे कर्मचारी पोहचवण्यासाठी वेळ लागते शासनाची वाट न पाहता वाहन धारकांनीच झाडे आणि विद्युत खांब बाजूला करून रस्ता सुरळीत केला
