Home Breaking News गेल्या 24 तासात 3 पॉझिटिव्ह रुग्ण , 4 कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी...

गेल्या 24 तासात 3 पॉझिटिव्ह रुग्ण , 4 कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1882 बेड उपलब्ध

20

यवतमाळ, दि. 10 : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 603 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 300 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 19 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72758 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70953 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 85 हजार 701 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 12 हजार 926 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.61 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.50 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1882 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1882 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 621 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 7 रुग्णांसाठी उपयोगात तर 629 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©