कोरोना मुळे सध्या सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत.विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून आणि शाळेत राबविले जाणाऱ्या दैनंदिन उपक्रमापासून वंचित आहेत.त्यापैकीच एक शालेय उपक्रम म्हणजे “दिनविशेष उपक्रम” आहे. दैनंदिन उपक्रमातुन विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले संस्कार रुजवविले जातात. सध्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना या दिनविशेष चे विस्मरण होत चालले आहे.
या दिनविशेष उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे विस्मरण होऊ नये व विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजावे व हा दिनविशेष उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा म्हणून पंचायत समिती बाभुळगाव मधिल जिल्हा परिषद शाळा चोंढी येथिल उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती वनश्री महालकर आपल्या स्वंयनिर्मित कार्टुन व्हिडिओच्या माध्यमातून “दिनविशेष हा उपक्रम” राबवित आहेत.
विद्यार्थ्यांना कार्टुन आवडतात हे त्यांनी हेरले आणि त्यातुनच त्यांना या दिनविशेष उपक्रमाची कल्पना सुचली. कार्टुन व्हिडिओच्या या दिनविशेष उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमास विद्यार्थ्यांचे मिळणाऱ्या प्रतिसाद बद्दल व श्रीमती वनश्री महालकर यांच्या या कार्यासाठी व शाळा बंद असतांना सुरु असलेल्या या उपक्रमाविषयी पंचायत समिती बाभुळगावचे गटशिक्षणाधिकारी श्री -देवानंद रामटेके तसेच विस्तार अधिकारी श्री. मंगेश देशपांडे तथा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री संजय पोकळे यांनी कौतुक केले आहे.
