ग्रामीण पत्रकारांच्या मागण्या मंजूर करा
– ग्रामीण पत्रकार संघटनेची मागणी
मारेगाव: संविधानाचा चौथा आधार स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या अनेक मागण्या मात्र प्रलंबितच आहे.याच अनुषंगाने ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी.एल. शिरसाठ यांच्या जयंती निमित्त पत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
यात स्वर्गीय पी.एल.शिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ र. न. महा 477 एफ 19197 या संघटनेला राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेप्रमाणे मान्यता देण्यात यावी.(अधिस्विकृती).तसेच ग्रामीण भागातील नियमित पत्रकारांना ॲक्रीडीएशन देणे (अधिस्वीकृती) म्हणजेच ग्रामीण स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकारांना एस. टी. प्रवास सवलत, रेल्वे प्रवास सवलत, टोलनाका सवलत आदी सवलती देण्यात याव्यात.
बातमी हस्तगत करतांना पत्रकारांना अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो. प्रसंगी प्राण सुद्धा गमवावे लागतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. म्हणून पत्रकरांचा शासनाकडून दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे.
तसेच कोरोना च्या प्रभावाचे वृत्त संकलन करतांना अनेक पत्रकार मृत्यूमुखी पडलेत, त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत करावी.ग्रामीण पत्रकारांना नियमित मानधन मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी.
तालुका व जिल्हास्तरावर अशासकीय समितीवर संबंधित ग्रामीण भागातील पत्रकारांची निवड करावी.
संबंधित वृत्तपत्र मालक/संपादक यांनी पत्रकार/वार्ताहर/प्रतिनिधी/बातमीदार/छायाचित्रकार म्हणून ओळख पत्र द्यावे. तिन वर्षापर्यंत नियमित बातम्या पाठवणारे पत्रकारांना कायम स्वरुपी ओळख पत्र द्यावे.सतत विस वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) ची व्यवस्था करण्यात यावी.
आदी मागण्या घेऊन मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, उपाध्यक्ष देवेंद्र पोल्हे सचिव नागेश रायपुरे,कार्याध्यक्ष अशोक कोरडे,कोषाध्यक्ष उमर शरीफ,सहसचिव श्रीधर सिडाम,प्रसिध्द प्रमुख दिलदार शेख आदी उपस्थित होते
