यवतमाळः नैसर्गीक अवकृपेमुळे कधी दुष्काळी तर कधी अतीवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासन, राज्य शासन व शेतकऱ्यांच्या संयुक्तरित्या प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिल्या जातो. परंतु नैसर्गीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे कोटयावधी रूपये हडप करून स्वतःचे खीसे भरणाऱ्या वाशीम व यवतमाळ येथील रिलायन्स व इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स विमा कंपन्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खा. भावनाताई गवळी यांनी दोन्हीही जिल्हयात आंदोलने केले होती. यवतमाळ येथे हजारो शेतकऱ्यांसह ‘‘जबाब दो’’ आंदोलन केले होते. सन 2020-21 ला नैसर्गीक अवकृपेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकले नव्हते व पीक विमा कंपन्याकडून सर्वेक्षण करणारे सर्वेक्षर कमी संख्येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण योग्य प्रकारे होत नव्हते. कृषी विभागाने केलेेले शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे सर्वेक्षण ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा हया मागणीला समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे खा. भावनाताईंच्या उपस्थित झालेल्या आंदोलनामुळे खा. भावनाताई गवळी यांच्यासह शेतकरी नेते व शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते. परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्का करीता खा. भावनाताई गवळी यांनी राज्य शासनासह केंद्र शासनाकडे पीक विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना लाभ मिळावा या करीता पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
खा. भावनाताई गवळी यांच्या पाठपुराव्याला यश येवून केंद्रीय नैसर्गीक व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानाचे केलेले सर्वेक्षण ग्राह्य धरून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतच्या सुचना पीक विमा कंपन्यांना दिल्या त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले नव्हते परंतु पिक विमा काढला होता तथा कृषी विभागाच्या सर्वेमधील यादीमध्ये समावीष्ठ असलेल्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचे झालेल्या नुकसानाची पीक विमा रक्कम मिळण्याकरीता उशीरा अर्ज केले अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यवतमाळ जिल्हयातील पीक विमा काढलेला आहे. परंतु लाभ मिळाला नाही अशा 49256 शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याकडून लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरीता नेहमी झगडणाऱ्या भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नाचे फलीत झाले.
