सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे आज ओबीसी आरक्षण बचाव मटका फोड आंदोलन करण्यात आलेत, स्व.वसंतरावजी नाईक चौक सावळी सदोबा येथे जितेंद्र भाऊ मोघे यांच्या नेतृत्वात,केंद्र शासनाच्या ओबीसी आरक्षण बचाव “मटका फोडो”आंदोलन करण्यात आलेत, यावेळी मोदी सरकार यांच्याकडून ओबीसी समाजाच्या राजकीय कारकीर्द तथा घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये ओबीसी समाजांना दिलेले आरक्षण समाप्त करण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र असून,यासाठी ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे असे मत जितेंद्र मोघे यांनी व्यक्त केले,आंदोलनाची सुरुवात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देत,ओबीसी समाजामध्ये मोडणाऱ्या बारा बलुतेदार भोई,कुंभार, शिंपी,धोबी,लोहार,नाव्ही,यासारख्या बारा बलुतेदार समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये मटके फोडून आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेत,यावेळी जितेंद्र मोघे, बाळासाहेब शिंदे,मुबारक तंवर, डॉ.रामचरण चव्हाण,वामन नाईक, विजय राऊत,उदयसिंह चव्हाण, किसन चव्हाण,प्रेम राठोड,सुनील चव्हाण,अशोक जगताप,राहुल देवतळे,दुलसींग चव्हाण सह काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते….!
