येथिल दाभडी रोडवरील वजन काटा मांगितल्या वरुन भांडनात सोहेल खान रफीक खान या युवकाने शेख अकील शेख गफ्फार यांचा डोक्यावर स्टील रॉडने मारुन गंभीर जख्मी केल्याची घटना २६ जुन रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली।
प्राप्त माहीती अशी की दाभडी रोडवरील भगतसिंह विद्यालयाच्या संकुल मध्ये शेख अकिल शेख गफ्फार मागिल तीन वर्षों पासुन स्टील रेलिंगची दुकान चालवित आहेत त्याने सोहेल खान या युवकाला आठ महिन्यापुर्वी दोन दिवसासाठी लोखंडी वज़न काटा दिला होता। अकीलचा लहान भाऊ शेख अलताफ दाभडी रोड़ वरिल रज़ा स्टील रेलिंग वर्कशॉप येथे वज़न काटा मांगायला गेला असता त्याला मारहान करित असल्याची माहीती मो.सकलैन मो.खान याने मोबाइल द्वारे शेख अकीलला दिली अकील भांडण सोडविण्यास गेला असता सोहेल खान रफीक खान वय २५ रा मुबारक नगर आर्णी या युवकाने शेख अकील शेख गफ्फार ४२ रा मुबारक नगर आर्णी यांच्या डोक्यावर स्टील रॉडने मारहान करन गंभीर जख्मी केले तसेच शिविगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद शेख अकील शेख गफ्फार याने आर्णी पुलिस स्टेशन मध्ये दिली।दिलेल्या तक्रारीवरुन आर्णी पुलिसांनी या प्रकरणी सोहेल खान रफीक खान २५ यांचा विरुद्ध आर्णी पुलिस स्टेशन मध्ये कलम ३२४,३२६,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे सध्या आरोपी फरार आहे त्याचा पुलिस शोध घेत आहे।



