राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगांव जिह्यातील भुसावळ शहराचे माजी नगराध्यक्ष तसेच रावेर यावल मतदारसंघाचे 2019 चे अपक्ष उमेदवार (45000 विक्रमी मतदान) मा. अनिल जी चौधरी साहेब यांनी मा. बच्चू भाऊ कडू यांचे हस्ते प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे सामाजिक कार्यासाठी हात बळकट करणार व पक्ष वाढीसाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे यावेळी चौधरी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले, उपस्थितांनी चाैधरी साहेबांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
