Home यवतमाळ डॉ भालचंद्र स्मृती दृष्टिदान सप्ताह 10 जून ते 16 जून साजरा

डॉ भालचंद्र स्मृती दृष्टिदान सप्ताह 10 जून ते 16 जून साजरा

34

——————————————–
घाटंजी -ग्रामीण रुग्णालय,घाटंजी आणी जिल्हा अंधत्व नियंत्रण समिति,यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून डॉ भालचंद्र दृष्टिदान सप्ताह साजरा करण्यात आला.
दिनांक 10 जून ते 16 जून या कालावधीत नेत्र तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येवून 300 लोकांची विनामूल्य नेत्र तपासणी करण्यात आली,यामध्ये मोतिबिंदु असलेल्या रुग्णापैकी 10 लोकांचे ऑपरेशन करण्यात आले. या शस्त्रक्रिया डॉ मनोज तगलपल्लीवार,डॉ मनोज सक्तेपार(जैन),डॉ स्मिता चव्हाण यांनी पार पाडल्या.
याच उपक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे मरणोत्तर नेत्रदान. या करिता ईच्छुक नेत्रदात्या कडून नेत्रदान संमती पत्रे भरून घेण्यात आली.
हा उपक्रम राबवन्याकरिता महेश पवार,रितेश बोबड़े यांचे सक्रीय सहकार्य लाभले.
या पुढे ही विविध उपक्रम व नेत्र शस्त्रक्रिया उपक्रम अविरत सुरु च राहणार असून गरजू नेत्र रुग्णानी या संधी चा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ नीरज कुंभारे,वैद्यकीय अधीक्षक, डॉ विलास मून ,नेत्र चिकित्सा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, घाटंजी यांनी केले आहे.

Copyright ©