Home यवतमाळ दारव्हा यवतमाळ रोड वरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे शेलोडी परिसरातील शेती चे नुकसान

दारव्हा यवतमाळ रोड वरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे शेलोडी परिसरातील शेती चे नुकसान

12

——————————————–
अर्धवट पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.
———————————————
दारव्हा तालुक्यातील शेलोडी मार्गे जाणारा यवतमाळ दारव्हा रस्त्यात ईगल इन्फोम कंपनी कडून पुलाचे बांधकाम कित्येक दिवसापासून सुरू आहे. या संथगतीने चाललेल्या बांधकामामुळे दिनाक १३ जून ला आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे पाणी या पुलाच्या बांधकामामुळे अडून नाल्याचे पाणी सरळ शेलोडी परीसातील शेतात घुसल्याने यात प्रथमतःच मेटाकुटीस आलेला शेतकरी या नुकसानीने चांगलाच अडचणीत सापडला आहे.
या पुलाचे बांधकाम ईगल नामक कंपनीने घेतला आहे. आणि रहदारीचा अथवा परिसरातील जनतेचा कोणताही विचार न करता मनमानी पद्धतीने स्वामर्जिने हे बांधकाम सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे बांधकाम होणे अपेक्षित होते. मात्र हा कंत्राटदार कोणत्याही नियमावलीचे पालन करताना आढळत नाही एवढे असले तरी संबधित अधिकारी हे मौन बाळगून का? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.
१३ जून ला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने एक तास दमदार हजेरी लावली. यात यावेळेत होत्याचे नव्हते झाले. आजू बाजूच्या शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली होती. मात्र या पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे नाल्यातून सरळ वाहून जाणारे पाणी काढलेल्या वळण रस्त्याला अडून सरळ शेतीच्या मार्गाने निघाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून याला सर्वस्वी या पुलाचे बांधकाम कंत्राटदारच आहे झालेल्या नुकसानीची तातडीने मोका पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी आणि या कंत्राटदारावर यातील जबाबदार अधिकारी कर्मचारी यांचेवर फौजदारी दाखल करावे व या पुलाचे अर्धवट बांधकाम तातडीने पूर्णत्वास न्यावे अशी मागणी शेलोडी येथिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. तसे न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आले आहे.

Copyright ©