Home यवतमाळ मोक्षधाम समितीच्या कोरोना योध्ययांचा मनसेतर्फे सत्कार

मोक्षधाम समितीच्या कोरोना योध्ययांचा मनसेतर्फे सत्कार

11

 

मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाणे यवतमाळ मोक्षधाम येथे ज्या प्रसंगी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांच्या मृतदेहाला त्यांच्या घरचेच हात लावायला तयार नव्हते अश्या परिस्थितीत त्या हिंदू धर्मातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या मुस्लिम समाजाचा लढवय्या जब्बारभाई आणि मोक्षधाम सेवा समितीच्या कार्यकर्त्या चा आज मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यवतमाळ येथील श्मशान भूमी कोरोना काळात अविरत धगधगत असतांना या कोरोना योध्ययांनी कोणतीही तमा न बाळगता आपल्या प्राण पणाला लावून सर्व कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पाडले. या काळात तर कित्येक नातेवाईक मृतदेहाला हात लावणे तर सोडा चेहरा पाहायलाही तयार नव्हते अश्या भीषण काळात जब्बारभाई यांनी सर्व मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या कोरोना योध्ययांचे हे ऋण यवतमाळकर जनता कधीही फेडू शकणार नाही , त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मनसेच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना अनिल हमदापुरे यांनी सर्व जातीधर्मपलीकडे मानवतेचा आदर्श घालून देणाऱ्या या कोरोना योध्ययना मनसेचा सलाम देत जब्बारभाई यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मनसे ने स्वीकारली असून मोक्षधाम सेवासमितीच्या मदतीला मनसे सदैव तत्पर राहील याची ग्वाही दिली. सोबतच मनसेतर्फेअंत्यसंस्कार साठी देण्यात येणाऱ्या मोफत पीपीई किटमुळे शेकडो कुटुंबाना आपला अंत्यसंस्कार चा हक्क मिळाला असून या बाबत या प्रसंगी या योध्ययांनी मनसेचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी प्रामुख्याने मोक्षधम समितीचे सचिन तुरकर, प्रशांत बिसेन, यासह मनसेचे साजिद शेख, दीपक आडे, विनोद दोंदल, आशिष सरूरकर, गजानन पोटे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©