Home यवतमाळ ठाणेदारची दबंग एन्ट्री पदभार स्विकारताच कार्यवाही चा सपाटा

ठाणेदारची दबंग एन्ट्री पदभार स्विकारताच कार्यवाही चा सपाटा

16

यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरेनी पदभार स्वीकारताच खाक्या दाखवत कार्यवाही चा सपाटा लावल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
नवीन ठाणेदारांनी पदभार स्वीकारतात ०४ जून रोजी रुई येथे सापळा रचून करण्यात आलेल्या जुगार कार्यवाही मध्ये ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपीवर विविध कलमन्वय गुन्हे दाखल करण्यात आले.
मागूळ येथे चालत असलेल्या अवैध दारू भट्टीवर धाड करून अवैध दारू अंदाजे १ लाख २० हजार रूपाचा मिद्देमाल जप्त करण्यात ग्रामीन पोलिसांना यश मिळाले व एका धाब्यावर छापा टाकत २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले तसेच दिनांक १४/०६/२०२१ रोजी
रुई येथील जुगार अड्डयावर कार्यवाही करून नगद १५ हजार व २ मोटारसायकल जप्त करून ८५,०० मुद्दमल जप्त करून कार्यवाही केली.दिनांक ०३/०६/२०२१ पासून दिनांक १५/०६/२०२१ पावेतो दारूबंदी कायद्या खाली २८ केसेस व जुगार कायद्या खाली ०५ केसेस करण्यात आलेल्या आहेत तसेच मागील १३ दिवसात ११० सीआरपीसि अंतर्गत २८,कलम ९३ मुंबई दारूबंदी कायद्या नुसार ५० व कलम ५६,५७ महाराष्ट्र पोलीस कायद्यानव्ये अंतर्गत ०३ लोकांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मागील अनेक वर्षापासून ग्रामीन भागात चालत आलेल्या अवैध व्यवसायाने नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र ग्रामीन पोलीस ठाण्यात याठाणेदार पदी किशोर जुनघरे रुजू होतास सिंगम या सिनेस्टाईल एन्ट्री ने अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस निरीक्षण किशोर जूनघरे यांच्या सुरवाती पासून अवैध व्यावसायिकान वर नजर होती रुजू झाल्यानंतर चालू झालेल्या सापळा कार्यवाही मुळे सर्वत्र ठाणेदार किशोर जूनघरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर हि कारवाई ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पि. आय. किशोर जूनघरे सोबत पि. एस. आय सचिन पवार, जमादार प्रेमसिंग राठोड ,जमादार लोथे , जयंत ब्राह्मणकर, पोलिस , विनोद राठोड, पोलिस , संदीप मेहेत्रे, पोलिस , खुशाल राठोड ,व इतर पोलिस कर्मचारी यांनी प्रयत्न केले .

Copyright ©