Home यवतमाळ आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा

10

 

 

शहरातील अनेक भागात विद्यार्थ्यांसह दाम्पत्यांनी केले वृक्षारोपण

 

खासदार भावनाताई गवळी यांच्या सूचनेनुसार युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त यवतमाळ शहर शिवसेना तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला.

 

सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गाने नागरीकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अशाही परीस्थितीत सामाजिक एकोपा टिकून राहावा तसेच पर्यावरणाबद्दल नागरीकांमध्ये प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांच्यासह युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अनुश्री पार्क, शिंदे नगर तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी तसेच दाम्पत्यांच्या हाताने वृक्षारोपण करुन घेतले. या सामाजिक उपक्रमात मोठया संख्येत नागरीकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे रोपण करण्यात आलेली झाडे परीसरातील नागरीक स्वतः दक्षता घेऊन मोठी करणार आहे. या रोपटयांना ट्री गार्ड लाऊन संरक्षण देण्यात आले आहे. यावेळी विक्रम सानप, अर्चना सानप, किशोर जीवतोडे, राजश्री जीवतोडे, प्रशांत मानकर, ज्योत्स्ना मानकर, दिवाकर ठाकरे, सरला ठाकरे, प्रभाकर धामनकर, पुष्पा धामनकर, गणेश पिंपळकर, सोनल पिंपळकर, प्रविण काळमोरे, शारदा काळमोरे, मनोज पायघन, दिपाली पायघण, रजनीश मडावी, संजीवनी मडावी, अमोल तराळकर, प्रिया तराळकर, मंगेश लोनकर, रश्मी लोणकर, प्रविण पोटे, निता पोटे, कुसूमबाई पोटे, प्रफुल्ल जिरकर, अनिकेत मोकळकर, समृध्दी ठाकरे, भूमिका जीवतोडे, विक्रांत जीवतोडे, अथर्व ठाकरे, तन्मय मानकर, श्लोक अभारे यांनी वृक्षारोपण केले. याव्यतिरीक्त शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर यांच्यासह शिवसैनिकांनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी राजू नागरगोजे, मनीष लोळगे, भुषण काटकर, युवासेना शहरप्रमुख, पवन शेंद्रे, तालुका प्रमुख, कंटेश तायडे, विनोद राऊत, पवन कुर्वे, आकाश जाधवर, सतीश निकम, अक्षय पाखरे, श्याम चौधरी, ऋषभ आसकर, सचिन तोंडरे, विकास शेळके, प्रफुल कोडापे, अनिकेत थोरात, आशिष ढोले, आकाश गायकी, नितीन उपाध्याय, संकेत उन्हाळे, संजय बांगर, गणेशभाऊ गावंडे, शैलेश जगदाळे, श्रीधर कपिले, प्रविण कुळमथे, प्रशांत भोयर, पुरुषोत्तम पेंदोरकर, सुभाष पाईकराव, विनोद बळखंडे, रामेश्वर मारबते, अवधुत मंडाळे, रमेश मासाळ, सतिष भोयर, सुनिल खंदरकर,

राजेश उईके, अशोक नंदेवार, अनिल नाकतोडे तसेच मोठया संख्येत शिवसैनिक सर्व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©