Home यवतमाळ दिग्रस तालुक्यात 27 हजार कुटूंबाना मिळाला मोफत धान्याचा लाभ

दिग्रस तालुक्यात 27 हजार कुटूंबाना मिळाला मोफत धान्याचा लाभ

12

केंद्र शासन व राज्य सरकार च्या धोरणानुसार दिग्रस तालुक्यातर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकंदरीत २७ हजार कुटूंबानी मोफत धान्याचा लाभ घेतला असल्याची अधिकृत माहिती स्थानीय प्रशासनाने दिली आहे गत २ महिन्यापासून covid-19 चा वाढता आलेख पाहता कोरोना व्हायरस चा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली व परिणामी मृत्यूचे प्रमाण ही वाढले होते त्यामुळे राज्य सरकार कडून टाळे बंदी करण्यात आली होती त्यामुळे सर्व सामान्य तथा गरीब कुटुंबाच्या उदर निर्वाहाची समस्या निर्माण झाली होती त्यामुळे केंद्र शासनाने माहे मे व जुन या दोन महिन्यासाठी प्रधान मंत्री गरीब कल्याणअन्न योजना तर राज्य शासनाने मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना माहे मे करिता राबविण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार या दोन्ही योजनेत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत येत असलेल्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनातील शिधापत्रिका धारक यांना मोफत धान्य वितरित करण्यात आले आहे त्यात दिग्रस तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील ९९ रास्त भाव धान्य दुकान अंतर्गत अंत्योदय अन्न योजना चे ५४०५ कुटुंबातील २३५८८ युनिट तर प्राधान्य कुटुंब योजनेचे २१७५० कुटुंबातील ९२६६३ युनिट यांना माहे मे महिन्यात प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना व मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चा लाभ देण्यात आला आहे यात माहे जून महिन्यात प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिका धारकांना या मोफत धान्याचा लाभ देण्यात येणार असुन केंद्र व राज्य शासनाच्या पुढील निर्देशानुसार अंमल बजावणी करण्यात येणार आहे यासाठी दिग्रस चे तहसीलदार राजेश वजीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी नियोजन बद्ध कार्य केले

Copyright ©